डाॅक्टर तुम्ही सुध्दा...??? रविवारी एका कार्यकमास गेलो. खूप दिवसांनी एक छान गेट टूगेदर झालं. आमचा एक मित्र आला नाही म्हणून त्याला फोन केला असता, त्याच्या मुलाला बरं वाटतं नव्हतं म्हणून तो आला नव्हता असे म्हणाला. मी विचारले "काय झालंय?" तर तो म्हणाला रात्री पासून त्याला उलट्या होत होत्या, त्यानं काही खाल्लही नव्हत. त्याच्या आवाजावरून तो काळजीत असलेला वाटला. मी अधून मधून फोन करून त्याची विचारपूस करत होतो. संध्याकाळी सहा वाजता फोन केला तर तो सोनोग्राफीकरीता इस्पितळा मध्ये होतां. मी लगेच निघालो. दरम्यान मला आमचा दुस-या मित्राचा फोन आला. त्याला मी सगळी परिस्थिती सांगितली, तो म्हणाला "मी पण तिकडे येतो मग आपण काय ते बोलू" आम्ही दोघे तिथे पोहोचलो तेव्हा हे कॅज्वल्टीमधे होते. सोनोग्राफी मधे "आंत्रपुच्छ" (अपेंडीस) वाढले असल्याने त्वरित ऑपरेशन करावे लागेल असे डाॅक्टर म्हणाले. दरम्यान अॅन्टीबायोटीक आणि सलायनमुळे मुलगा चांगलाच सावरला होता. पोट दुखायच थांबलं होतं. तो म्हणाला "मला उद्याचा पेपर द्यायचा आहे आणि मग मी अॅडमीट होईन" तसे डाॅक्टरना सांगताच त्यांचा ...
पोस्ट्स
नोव्हेंबर, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे