डाॅक्टर तुम्ही सुध्दा...???
रविवारी एका कार्यकमास गेलो. खूप दिवसांनी एक छान गेट टूगेदर झालं. आमचा एक मित्र आला नाही म्हणून त्याला फोन केला असता, त्याच्या मुलाला बरं वाटतं नव्हतं म्हणून तो आला नव्हता असे म्हणाला. मी विचारले "काय झालंय?" तर तो म्हणाला रात्री पासून त्याला उलट्या होत होत्या, त्यानं काही खाल्लही नव्हत. त्याच्या आवाजावरून तो काळजीत असलेला वाटला. मी अधून मधून फोन करून त्याची विचारपूस करत होतो. संध्याकाळी सहा वाजता फोन केला तर तो सोनोग्राफीकरीता इस्पितळा मध्ये होतां. मी लगेच निघालो. दरम्यान मला आमचा दुस-या मित्राचा फोन आला. त्याला मी सगळी परिस्थिती सांगितली, तो म्हणाला "मी पण तिकडे येतो मग आपण काय ते बोलू" आम्ही दोघे तिथे पोहोचलो तेव्हा हे कॅज्वल्टीमधे होते. सोनोग्राफी मधे "आंत्रपुच्छ" (अपेंडीस) वाढले असल्याने त्वरित ऑपरेशन करावे लागेल असे डाॅक्टर म्हणाले. दरम्यान अॅन्टीबायोटीक आणि सलायनमुळे मुलगा चांगलाच सावरला होता. पोट दुखायच थांबलं होतं. तो म्हणाला "मला उद्याचा पेपर द्यायचा आहे आणि मग मी अॅडमीट होईन" तसे डाॅक्टरना सांगताच त्यांचा रंग पालटला ते जोरात बोलायला लागले "हे बघा तो सिरीयस आहे. त्याला काही झाले तर आमची जबाबदारी नाही" आम्ही म्हंटल तरी चालेल आपण याला घरी नेऊ, उद्या त्याला परिक्षा देऊदे मग त्याला अॅडमीट करू, आणि तसंच काही वाटलं तर पुन्हा घेऊन येऊ. डाॅक्टरांचा आवाज चढल्यावर मुलाच्या आईचा आवाजही चढला. त्यांनी सही केली आणि आमच्या जबाबदारी वर त्याला घरी घेऊन आलो. त्या दोघांना घरी पाठवल्यावर, आमचा अजून एक मित्र शिरीष भेटला. त्याला आम्ही सगळी घटना सांगीतली तो म्हणाला तुम्ही हिंदू काॅलनीत डाॅ. प्रधानांकडे का जात नाही? खूप छान डाॅक्टर आहेत आणि माणूस म्हणून ही छान आहेत. मग आम्ही त्या मित्राला बोलावले आणि त्याला सेकंड ओपिनीयन घेण्यास सांगितले. त्याने मिसेसला फोन केला आणि सकाळी डाॅ.प्रधानांकडे जाण्याचे ठरवले. सकाळी त्याला परिक्षेला सोडल्यावर मित्राने फोन केला आणि म्हणाला "तो व्यवस्थित आहे. रात्री छान झोपला होता, पेपर संपल्यावर आम्ही डाॅक्टरांकडे जाणार आहोत" साधारण साडे अकरा वाजता त्याचा फोन आला आणि ऐकून मी दचकलोच. डाॅक्टरांच्या म्हणण्या नुसार ही केस 'फुड पॉयझनिंगची' आहे त्याला अपेंडीस नव्हतेच डाॅक्टर म्हणाले "अशा प्रकारच्या लोकांमुळे आमचे प्रोफेशन बदनाम होत आहे" मित्रांनो आपणा पर्यंत हे पोहोचावे म्हणून हा लेखनप्रपंच. मोठ्या इस्पितळात हे होत आहे. तरी यापुढे केवळ एकाच डाॅक्टरांवर भरोसा न ठेवता दुस-या डाॅक्टरांचे मत अवश्य घ्यावे. ज्यांना आम्ही देव मानतो त्यांनीच कसाई व्हावे हे आमचे दुर्भाग्य.
- दीपक कांबळी

लेखक/ कवी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गझल