पोस्ट्स

2020 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

गझल

  दिसली इथे अम्हाला भरपूर माणसे का वाटली तरीपण ही दूर माणसे देतात प्राण येथे देशाप्रती अशी आहेत फार थोडी ही शूर माणसे जगणे खरेच सुंदर गाण्यापरी असे जगण्यातला विसरली पण सूर माणसें शांतीत नांदतो हा जर‌ देश आपला त्याच्यात का उठवती काहूर माणसे आनंद मानती जे कामात आपल्या आहेत आजही ती मजदूर माणसे सोसून हाल येथे मौनात राहती आहेत फार येथे मजबूर माणसे - डीके

*फ्लाईंग स्काॅड क्रं- १

मित्रांनो नमस्कार आजपासून मी एक नवी लेखमाला घेऊन येत आहे. "फ्लाईंग स्काॅड क्रं- १" मला या युनिटमध्ये काम करत असताना आलेले अनुभव मी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करीत आहे आशा आहे आपणाला या घटनांचा आस्वाद घेता येईल...हे लेख मी प्रत्येक मंगळवारी सादर करणार आहे. आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे लेख कसा वाटला ते कमेंट्स द्वारे कळवा. *फ्लाईंग स्काॅड क्रं- १* * श्रीगणेशा *           २४ ऑगस्टपासून २००३ मी भरारीपथक क्रंमांक- 1 या पदाचा कार्यभार स्विकारला. सोबत अर्थात "नारायणराव जगदाळे" खरंतर! त्यांच्यामुळेच मी इथे आलो होतो. आमचे निरिक्षक होते "सुरेशजी नागरे" (हल्लीच ते दिवंगत झाले) एकदम उमदा माणूस. सुरवातीस आमच्यात कम्युनिकेशन गॅप होती. पण जशी जशी कामं होत गेली ती कमी होत गेली.            ‌आम्ही तिघं पहिल्यांदाच एकत्र येत होतो. जगदाळे साहेबांना भरारी पथकाचा अनुभव होता. मी तर अगदीच कोरा करकरीत होतो. मला माझ्या कामाचा श्रीगणेशा करायचा होता. लवकरच ती वेळ आली एका संध्याकाळी मोहिमेवर जायचे ठरले.           जगदाळे स...