चव लालबागची
चव लालबागची २४ ऑक्टोबर २०२२
लालबागचं रूपडं जरी बदलत चाललंय, तरी काही गोष्टी अजून तशाच आहेत. बरेच टाॅवर झालेत पण अजून काही चाळी शिल्लक आहेत. तांबावाला चाळ, बटाटा चाळ,
हरहरवाला चाळ, पतंगे यांचे कपड्यांचं दुकान अजूनही आहे आणि तिथे लोकांची वर्दळही दिसते. गुरूकृपा साड्यांचे, धार्मीक पुस्तकांचे, दुकान अजूनही आहे.
खाण्याच्या बाबतीत लाडु सम्राटचे बटाटेवडे, मिसळ, यांना अजूनही तशीच मागणी आहे. नव्याने आलेल्या माजघर मधे गर्दी असतेच पण दत्त बोर्डींगच्या पार्सलची रांग अजूनही असतेच. शिरसागर अजूनही आहे. मागे मस्त मालवणी अजून सुरू आहे. तिथे मालवणी भोजनासाठी अजूनही ग्राहक असतात. खास करून मत्स्य प्रेमी तिथे आवर्जून जातात.
मिसळसाठी नवीन आलेल मार्तंड यांनीही मांसाहारी प्रेमींसाठी नवीन हाॅटेल सुरू केलंय. त्यांचं काळ मटण ही डीश सध्या जोरात चालतेय. अख्खा मसूर कोल्हापूर हे झणझणीत जेवणासाठी प्रसिद्ध आहे.
एकंदरीत खाद्य प्रेमींची चंगळ अजून सुरू आहे. खास करून शनिवारी रविवारी या दुकानासमोर चक्क रांगा दिसतात. बाकी वडापाव, भजीपाव, यांना मागणी आहेच.
चिवडा गल्लीतील (गणेश नगर) शिंदे वडापाव हल्ली जोरात आहे. हे शिंदे एका हाॅटेलमध्ये शेफ होते. कोवीड काळात त्यांनी ही गाडी सुरू केली. अगदी लालबागच्या राजा समोर यांची गाडी लागते. चव चांगली असल्याने लवकर संपतेही.
तर मित्रांनो! लालबागला आल्यावर चव चाखायला हरकत नाही बरं का. तसं खास त्यासाठी यायलाही हरकत नाही.
- दीपक कांबळी
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा