पोस्ट्स

2022 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

क्रांतिनगर उत्सव समिती भाग - २

क्रांतिनगर उत्सव समिती.               ४ नोव्हेंबर २०२२ भाग दोन          ‌ज्यांनी आधीचा होळीचा लेख वाचला नसेल त्यांनी आधी तो लेख वाचावा म्हणजे त्यांना लिंक लक्षात येईल. तर मार्च महिन्यात होळी साजरी करण्यात आल्यानंतर आम्हाला वेध असायचे ते शिवजयंती या उत्सवाचे. ३ दिवस हा उत्सव अगदी उत्साहाने साजरा केला जायचा. एप्रिल किंवा मे महिन्यात शिवजयंती असायची. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे उन्हाळ्याची सुट्टी पडलेली असायची. त्यामुळे संपूर्ण दिवस वाडीत हुंदडता यायचे. डेकोरेशन, लाईट याची जबाबदारी अर्थातच आप्पा बोरकर यांची. त्यांना मदत करायला बरीच पोरं असायची. काही चुकलं तर आप्पा चष्म्याच्या वरून रागाने बघायचा पोरं घाबरली की स्वतःच हसायचा. आप्पा म्हणजे एकदम जिंदादिल माणूस.           हा उत्सव ३ दिवसांचा असायचा मुख्य म्हणजे या उत्सवात स्पर्धा असायच्या अगदी चमचा लिंबू बादलीत चेंडू टाकणे वगैरे पासून आंतरचाळ रस्सी खेच स्पर्धे पर्यंत. कब्बडी, क्रिकेट, या आंतरचाळ स्पर्धा तसेच सिंगल विकेट ही क्रिकेटची वय्यत्तिक स्पर्धा. म...

दिवाळी

  दीवाळी                                 २१ ऑक्टोबर २०२२       चाळ संस्कृतीत दीवाळीला फार महत्त्व होते. पंधरा दिवस आधीच दीवाळीच्या फराळाची तयारी सुरू व्हायची. प्रत्येक घरात एक दिवस ठरलेला असायचा. सगळ्या गृहिणी त्या दिवशी त्या घरात फराळाच्या मदतीसाठी जायच्या. मग त्यांचं चहापाणी तिथेच असायचं आणि नेमकं त्याचवेळी आम्ही तिथे टपकायचो. संपुर्ण गल्लीत फराळाचा सुवास दरवळायचा.      दीवाळीच्या दीवसात नळावरची भांडणंही बंद व्हायची तिथे आज कुणाच्या घरी जायचं हीच चर्चा असायची. त्यावेळी निसर्गही सुंदर असायचा. गोड गुलाबी थंडी पडायची. आम्हाला दीवाळीची सुट्टी असायची. अख्खा दिवस गच्चीत पतंग उडवायचो. खबर काढून नाश्त्याला योग्य ठिकाणी हजर व्हायचो. किती छान दिवस असायचे ते.       दादा लोकं बांबू तासून कंदील बनवायला घ्यायचे तिथे छोटी मोठी मदत करायला जायचो. काय एकेकाची कलाकारी अस...

अण्णा पानवाले

  अण्णा पानवाले              क्रांतिनगर गिरगाव माझं जन्म स्थान. नुसतंच जन्मस्थानच नाही तर आयुष्यातली सुरवातीची पस्तीस वर्षे मी त्या चाळीत काढलीं. जगन्नाथ शंकरशेट रोडवरील या क्रांतिनगर मध्ये  "ए टू एन" अशा ८ चाळी होत्या सध्या मेट्रो प्रकल्पासाठी क्रांतिनगरचा डाव्या बाजूचा अर्धा भाग जमीनदोस्त करण्यात आला आहे.             मला आठवतंय क्रांतिनगरमध्ये आत शिरताना उजव्या बाजूला अण्णा पानवाल्यांची पानाची गादी होती. मी सुद्धा लहान असताना आजीची पान सुपारी, आजोबा आणि वडिलांच्या विडी सिगारेट घ्यायला त्यांच्याकडे जायचो. अगदी नाक्यावर दुकान असल्याने आत येणारा जाणारा माणूस अण्णांच्या नजरे समोरूनच जायचा. त्यामुळे कोण कधी येतो कधी जातो याची अलिखीत दस्त नोंदणी अण्णांकडे असायची. कधी कुणी लहान मुल ( मोठे सुद्धा) हरवलं तर त्याला कधी किती वाजता आणि कोणाबरोबर बाहेर जाताना पाहिले हे अण्णांकडूनच समजायचं.             पुढे मोठा झाल्याव...

चव लालबागची

 चव लालबागची                २४ ऑक्टोबर २०२२       लालबागचं रूपडं जरी बदलत चाललंय, तरी काही गोष्टी अजून तशाच आहेत. बरेच टाॅवर झालेत पण अजून काही चाळी शिल्लक आहेत. तांबावाला चाळ, बटाटा चाळ, हरहरवाला चाळ, पतंगे यांचे कपड्यांचं दुकान अजूनही आहे आणि तिथे लोकांची वर्दळही दिसते. गुरूकृपा साड्यांचे, धार्मीक पुस्तकांचे, दुकान अजूनही आहे.       खाण्याच्या बाबतीत लाडु सम्राटचे बटाटेवडे, मिसळ, यांना अजूनही तशीच मागणी आहे. नव्याने आलेल्या माजघर मधे गर्दी असतेच पण दत्त बोर्डींगच्या पार्सलची रांग अजूनही असतेच. शिरसागर अजूनही आहे. मागे मस्त मालवणी अजून सुरू आहे. तिथे मालवणी भोजनासाठी अजूनही ग्राहक असतात. खास करून मत्स्य प्रेमी तिथे आवर्जून जातात.     मिसळसाठी नवीन आलेल मार्तंड यांनीही मांसाहारी प्रेमींसाठी नवीन हाॅटेल सुरू केलंय. त्यांचं काळ मटण ही डीश सध्या जोरात चालतेय. अख्खा मसूर कोल्हापूर हे झणझणीत जेवणासाठी प्रसिद्ध आहे.      एकंदरीत खाद्य प्रेमींची चंगळ अजून सुरू आ...

पेपरवाला

  पेपरवाला बरीच वर्षे पेपर घरी येतो पण पेपरवाला कोण आहे हे कधी पाहिलंच नव्हतं. पुर्वी महिना झाल्यावर बिल घ्यायला तरी पेपरवाले यायचे पण आता कंपनीवाले वर्षाचे पैसे एकदम घेऊन जातात. हल्ली पेपरची स्किम असते. आमच्याकडेही आहे. म्हणजे तेव्हा मुलगी होती तिच्यासाठी इंग्रजी पेपर आणि त्यावर मराठी पेपर फ्री अशी स्किम होती. आता मुलीचं लग्न झालं ती तिच्या घरी गेली. मी म्हंटल "आता इंग्रजी पेपर कशाला बंद करूयात" तर सौ म्हणतात "असुद्यात इंग्रजी पेपर ची रद्दी खूप असते" यावर मला हसताही येईना पण खरंय ते. इंग्रजी पेपर कसा जाडजूड असतो. शिवाय कागद आपल्याला लागतच असतो कावळ्याच्या घास ठेवायला वगैरे. काय म्हणता 'अजून? असतो' म्हणजे असतोच. ती चाळीतली परंपरा आम्ही इथेही जपली आहे. मला आठवत लहानपणी पेपरचे चौकोनी तुकडे करून ठेवायचं काम माझ्याकडे होतं. 'कशाला?' अहो कशाला काय आमच्या आजोबांना आणि पणजीला तंबाखूची मिश्री लावायची सवय होती. स्टोवर तंबाखू भाजायला घेतला की आम्ही धूम पळायचो. असो! तर या पेपरवाल्याला गाठायच ठरवलं पण जमतच नव्हतं. कारण सकाळी सात वाजता पाहिलं तरी पेपर दारात...

इस्त्रीवाला

  इस्त्रीवाला लिफ्ट मधून बाहेर पडलो आणि समोर इस्त्रीवाला दिसला. त्याच्या हातात कपड्यांचं गाठोडं होतं. "सर तुमचेच कपडे आहेत" आली का पंचाईत आता घरी कुणी नव्हतं म्हणजे याच्या सोबत पुन्हा वर जाण आलं. विचार करेस्तोवर लिफ्ट वर गेली होती. म्हणजे लिफ्ट येइपर्यंत थांबणं आलंच. मी निरखून त्याच्या कडे पाहिलं‌ पावणे सहा फुटाचा दणकट पण करपटलेला देह. ढगाळ पॅन्ट वर चौकडीचा शर्ट. दाढीचे खुंट वाढलेले. केस फक्त सकाळीच विंचरत असावा. तसेही कुरळ्या केसांना विंचरायची आवश्यकता कमीच‌ असते. वादळ आलं तरी हलणार नाहीत असे दाट कुरळे केस. "तुझं शिक्षण झालय का?" "हो सर" "किती शिकलायस?" "सर बीए झालोय" "काय?' मी जवळ जवळ ओरडलोच "हो सर " "मग चांगलं काम का करत नाही" "सर चांगल म्हणजे? हे वाईट आहे का? सर मेहनतीचे काम आहे" "तेच म्हणतो" मी जरा सावरून बोललो "कुठे तरी शिक्षक किंवा एखाद्या ऑफिसमध्ये" "म्हणजे नोकरीच ना?" "अं...हो" मी चाचरत "आपल्याला नोकरी नाय जमणार सर" तो अ...